या पोस्टमध्ये तुम्हाला कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स – Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics, English Lyrics सोबत Abhang या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
कशाला काशी जातो रे बाबा !
कशाला पंढरी जातो ! ।।धृ0।।
संत सांगती ते ऐकत नाही,
इंद्रियाचे ऐकतो ।
कीर्तनी मान डोलवितो परी,
कोंबडी,बकरी खातो !।१।
वडील जनाचे श्राध्द कराया,
गंगे मध्ये पिंड देतो ।
खोटा व्यापार जरा ना सोडी,
देव कसा पावतो ।।२।।
खांदी पताका,तुळसी गुळ्यामधे,
घडी-घडी टाळ वाजवतो ।
गरीब-जनांची दया ना चित्ती,
दानासी हात आवरतो ! ।।३।।
झालेले मागे पाप धुवाया,
गंगेत धावुनी न्हातो ।
तुकड्या म्हणे,सत्य-आचरण वाचोनी,
कोणीच ना मुक्त होतो ।।४।।
I hope you liked कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स – Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स – Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा