या पोस्टमध्ये तुम्हाला Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Lyrics In Marathi, English Lyrics सोबत bhajan या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
दत्त दिगंबर दैवत माझे
अनुसूयेचे सत्त्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे
त्रईमूर्ती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे
दत्त दिगंबर दैवत माझे
तीन शिरे कर सहा शोभती, हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी पायी खडावा भस्म विलेपित कांती साजे
दत्त दिगंबर दैवत माझे
पाहुनी पेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती, हळूहळू सरते मीपण माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
दत्त दिगंबर दैवत माझे
I hope you liked Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Lyrics In Marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Lyrics In Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा