Hanuman Aarti Marathi Lyrics – Marathi Song Lyrics Online

In this lyrics article you can read Hanuman Aarti Marathi Lyrics, with English Lyrics from category aarti lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Hanuman Aarti Marathi Lyrics, English Lyrics सोबत aarti या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

मारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनिं ।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥
दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द ।
थरथरल्या धरणीवर मानिला खेद ।
कडकडिले पर्वत उड्डुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ॥ २ ॥
जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता ।
जय देव जय देव ॥

0eR3DQHOHakI

I hope you liked Hanuman Aarti Marathi Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Hanuman Aarti Marathi Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment