या पोस्टमध्ये तुम्हाला आईचा जोगवा – Aaicha Jogwa Lyrics in Marathi – Jogwa lyrics in marathi, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
आईचा जोगवा Aaicha Jogwa Lyrics – Jogwa lyrics in Marathi
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन
अनादी निर्गुणी प्रगटली भवानी ।
मोह महिषासूर मर्दनालागूनी ।
विविध तपाची करावयाची झाडणी ।
भक्तालागी तू पावसी निर्वाणी ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारूनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन
नवविध भक्तीच्या करुन नवरात्रा ।
करूणा पोटी मागेन मी ज्ञानपुत्रा ।
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ सासर्या सांडीन कुपात्रा ॥३॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |
पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन मी कुर्वंडी ।
अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |
आता साजनी झाले मी निसंग ।
विकल्प नवर्याचा सोडियला, संग ।
कामक्रोध हे झोडियले मांग ।
केला मोकळा मार्ग सुरुंग ॥५॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |
ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाऊनी नवस महाद्वारी फेडिला ।
एकपणे जनार्दन देखियला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |
0watch?v=IE7e0dysyYs
I hope you liked आईचा जोगवा – Aaicha Jogwa Lyrics in Marathi – Jogwa lyrics in marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला आईचा जोगवा – Aaicha Jogwa Lyrics in Marathi – Jogwa lyrics in marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा