या पोस्टमध्ये तुम्हाला Bajarala Vikanya Nighali Lyrics in Marathi, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||
गोकुळच्या त्या गाई म्हशीचं
खाणं सगळं राण माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशा विणा घेणं
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||
यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुःखतिया पाट
नेहमीच तयाची वारी कट
थांबू नका गवळणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||
महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होवूनी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
I hope you liked Bajarala Vikanya Nighali Lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Bajarala Vikanya Nighali Lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा