He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो

In this lyrics article you can read He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो, with English Lyrics from category bhakti geet, ganpati songs lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो, English Lyrics सोबत bhakti geet, ganpati songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया

ॐकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाडं वेली पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठिराखा गरिबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया

आदि अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी, गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया

गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया
मोरया मोरया मोरया मोरया

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोटयानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
मोरया

I hope you liked He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment