Hi may bhumi hi janma bhumi lyrics

In this lyrics article you can read Hi may bhumi hi janma bhumi lyrics, with English Lyrics from category Marathi Lyrics lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Hi may bhumi hi janma bhumi lyrics, English Lyrics सोबत Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Hi may bhumi hi janma bhumi lyrics

हि मायभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची
(कोरस)
हि मायभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची
(सचिनs)
हा आमुचा आहे बाणा,
हि आमुची आहे बोली
(महेश)
अस्मानी झळके भव्य पताका
भगव्या जरीपटक्याची.
(कोरस)
महाराष्ट्रभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची

(सचिन s)

राकट देशा, कणखरं देशा,
दगडांच्या देशा
(कोरस)
प्रणाम माझा घ्यावा
हे श्री महाराष्ट्र देशा
(सचिन s)
भीमा, वरदा, कृष्ण, कोयना,
भद्रा, गोदावरी
(कोरस)
एकपणाचे भरती पाणी
मातीच्या घागरी
(महेश)
योग्यांची अन संतांची
भक्तांची, माळकर्‍यांची
हि देव, देश आणि धर्मासाठी
प्राण वेचणार्‍यांची
(सचिन b)
योध्द्यांची अन वीरांची
तलवारीच्या पात्यांची
देशाचे रक्षण करण्यासाठी
जीव खर्चणार्‍यांची
(कोरस)
हि भूमी सप्तसुरांची,
रंगांची अष्टकलांची,
काव्याची, शास्त्र, विनोदाची
हि भूमी साहित्याची
महाराष्ट्रभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची

I hope you liked Hi may bhumi hi janma bhumi lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Hi may bhumi hi janma bhumi lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment